

Homemade Snack Rolls
esakal
वैशाली खाडिलकर
वाढप २ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन कप बारीक चिरलेली पालकाची पाने, १ कप पनीरचा चुरा, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, प्रत्येकी १ टीस्पून चिली टोमॅटो केचप, चाट मसाला, आमचूर पावडर, पावभाजी मसाला व ड्राय मिक्स हर्ब्स पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स (आवडीप्रमाणे), गरजेनुसार तेल/तूप, पाणी, अर्धा कप बेसन, १ कप ज्वारीचे पीठ, पाव टीस्पून हळद,
१ ते २ टीस्पून लाल तिखट.
कृती
सर्वप्रथम पॅनमध्ये तेल तापवावे. त्यात पालकाची पाने परतावीत. मग त्यात आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, आमचूर पावडर, पावभाजी मसाला व मिक्स हर्ब्स पावडर घालून नीट एकजीव करावे. त्यानंतर पनीरचा चुरा, टोमॅटो केचप, मीठ व चिली फ्लेक्स घालून मिश्रण एकत्र करावे व मिनिटभर परतावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. हाताला तेल लावून या मिश्रणाचे लंबगोलाकार रोल्स करावेत. आता बेसन व ज्वारीच्या पीठात हळद व लाल तिखट एकत्र करावे. यात पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करावे. कढईत तूप किंवा तेल तापवावे. मग प्रत्येक रोल बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यावा. हे रोल्स सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर चविष्ट लागतात.
वाढप २ व्यक्तींसाठी
साहित्य
प्रत्येकी १ टीस्पून भोपळा, अळशी, सब्जा व सुर्यफुलाच्या बिया, तीळ, खसखस, बडिशेप आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, प्रत्येकी ४ टेबलस्पून वाफवलेले मटार किंवा मक्याचे दाण आणि मेथीच्या खाकऱ्याचा चुरा, प्रत्येकी १ टीस्पून मिरची-आले-लसूण पेस्ट, गोडा मसाला आणि लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर, गरजेनुसार तेल किंवा बटर, ४ मेथी पराठे.
कृती
एका वाडग्यात भोपळा, अळशी, सब्जा व सुर्यफुलाच्या बिया घेऊन त्यात तीळ, खसखस, बडिशेप आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे. त्यात वाफवलेले मटार किंवा मक्याचे दाणे, मेथीच्या खाकऱ्याचा चुरा, मिरची-आले-लसूण पेस्ट हे सर्व एकत्र करावे. नंतर त्यात गोडा मसाला, लिंबाचा रस, साखर, मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. आता मेथी पराठा घेऊन त्यात मध्यभागी हे स्टफिंग भरावे व त्याची घट्ट गुंडाळी करावी. याप्रमाणे सगळे मेथी पराठे तयार करावेत. आता ग्रिल पॅन किंवा तवा तापवून त्यावर हे रोल्स ठेवावेत व तेल किंवा बटर लावून खरपूस भाजून घ्यावेत. ओव्हनमध्ये बेकही करू शकता.