स्नेहल बाकरे
हृदयाची संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. डॉक्टरांसाठी तो शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; साहित्यिकांसाठी भावनांचं मोहोळ, तर प्रेमी युगुलांसाठी एक मनमोहक प्रेमानुभव आहे.
नव्वदच्या दशकात आलेल्या एका गाण्यामध्ये, जिच्यावर जान छिडकावी अशी, रेखा ‘दिल चीज़ क्या है, आप मेरी जान लिजिये...’ असं म्हणते तेव्हा आजही अनेकांच्या दिलाचे ठोके चुकतात... हृदयाची धडधड वाढते... हे हृदयाचे ठोके, धडधड हेच तर आपल्या जिवंत असण्याचं लक्षण! आणि म्हणूनच मानवी जीवनात हृदयाला एक वेगळंच स्थान आहे. प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार त्याचं स्वरूप बदलत जातं इतकंच!