डॉ. संजीव जाधव
हृदय प्रत्यारोपण ही आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारक प्रगती आहे. हे तंत्रज्ञान गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी निश्चितच एक आशेचा किरण ठरले आहे.
उपचारांनंतरही मेंदूचे कार्य पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसलेल्या म्हणजे ‘ब्रेन डेड’ रुग्णाच्या जवळचे नातेवाईक अवयवदानाचा निर्णय घेतात. त्यातून दान केलेले हृदय हृदयविकाराच्या अत्यवस्थ रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाते.
प्रत्यारोपणानंतर रुग्णाचे आयुष्य वाढते. वैद्यकशाखेतील अत्यंत गुंतागुंतीच्या आव्हानात्मक ठरलेल्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे संशोधन, त्यातील तंत्रज्ञान आणि डॉक्टरांचे कौशल्य यावर टाकलेला दृष्टिक्षेप...