Premium|Himachal Pradesh Travel : ‘कुठेतरी फिरायला जाऊ या’पासून हिमालयाच्या डोंगरांपर्यंतचा प्रवास

Travel Memories : पुण्यातील चार मित्रांच्या सहज सुरू झालेल्या गप्पांमधून हिमाचल प्रदेशचा प्रवास ठरला. या प्रवासाने डोंगर, धाडस, मैत्री आणि आयुष्यभर मनात राहणाऱ्या आठवणींचा अनुभव दिला.
Himachal Pradesh Travel

Himachal Pradesh Travel

eakal

Updated on

धनश्री पाटील

काही प्रवास संपतात, पण घेतलेले अनुभव मनाच्या कोपऱ्यात साठून राहतात. वेळ निघून जाते, ऋतू बदलतात, रोजचं आयुष्य पुन्हा सुरू होतं, पण एखाद्या क्षणी त्या प्रवासाची आलेली छोटीशी आठवण पुन्हा दार ठोठावते. हिमालयातल्या त्या डोंगरांमध्ये फिरताना जाणवलं, क्षितिजं दूर नसतात, फक्त ती धाडसानं गाठायची असतात.

‘‘चल ना यार, कुठेतरी फिरायला जाऊ या...’’ बरेचदा असं एखादं वाक्य एखाद्या प्रवासाची सुरुवात अन् आठवणींचं कारण होऊ शकतं. पुण्यातल्या एका कॅफेमध्ये आम्ही चार मित्र-मैत्रिणी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो होतो. निघताना सहज कोणीतरी म्हणालं, ‘‘चला फिरायला जाऊ या, खूप बोअर झालंय...’’ दरवेळीच्या भेटीत हे असं म्हटलं जातंच. पण यावेळी मात्र हे वाक्य सगळ्यांनीच सीरियसली घेतलं. मग कुठे जायचं हा विचार सुरू झाला. सगळ्यांचं महाराष्ट्रात बऱ्यापैकी फिरून झालेलं असल्यामुळे महाराष्ट्राबाहेर जायचं ठरलं. हंपी, गोवाही बघून झालं होतं. शेवटी पुद्दुचेरीला जाण्याचं ठरलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे पुन्हा भेटलो आणि गप्पांच्या ओघात अचानक माझ्या तोंडून निघालं, ‘‘हिमाचल प्रदेशला जायचं का?’’ क्षणभर सगळे शांत झाले आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांनी एकदम होकार भरला. मग हिमाचल प्रदेशात जाण्याचं नक्की झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com