Premium|Importance of hobbies for mental well-being : छंदांमधून मिळणारा आनंद; मनाची समृद्धी

Creative ways to find happiness : छंद म्हणजे केवळ वेळ घालवण्याचे साधन नसून ते मानवी मनाला समृद्ध करणारे आणि स्वतःशी ओळख करून देणारे आधारस्तंभ आहेत; साध्या क्षणांना अर्थ देऊन आनंद कसा शोधायचा, याचे रंजक दर्शन या लेखातून घडते.
Creative ways to find happiness

Creative ways to find happiness

esakal

Updated on

श्रुती भागवत

आनंद बाहेर कुठं, मोठ्या स्वरूपात मिळत नाही; तो आपला आपणच मिळवायचा असतो, हे छंदच आपल्याला शिकवतात. एखाद्या साध्या क्षणाला अर्थ देण्याची ताकद आपल्यात असते. छंद जोपासणं म्हणजे केवळ वेळ घालवणं नाही, तर छंद आयुष्याला रंग देणारे, मनाला समृद्ध करणारे आणि व्यक्तिमत्त्व घडवणारे आधारस्तंभ असतात. म्हणूनच प्रत्येकानं स्वतःसाठी असा एखादा कोपरा जपावा, जिथं मनमोकळेपणानं आनंद शोधता येईल...

आपलं आयुष्य रोजच्या धावपळीनं भरलेलं असतं. वेळेच्या काट्यावर धावताना आपण कित्येकदा स्वतःला विसरतो. जबाबदाऱ्या, अपेक्षा, स्पर्धा, भविष्याची चिंता या सगळ्यांच्या गर्दीत मन अगदी थकून जातं. पण अशा वेळी आपल्याला उभारी देतात त्या छोट्या-छोट्या गोष्टी. त्या फार मोठ्या नसतात, त्यासाठी मोठे खर्च किंवा विशेष नियोजन लागत नाही. कधी एखादा कप कॉफी, कधी रेल्वेच्या खिडकीतून दिसणारा सूर्यास्त, कधी शांत रात्रीचं आकाश आणि कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीचा हसरा चेहरा. हे सगळं जपून ठेवणारी गोष्ट म्हणजे छंद. छंद माणसाला स्वतःशी जोडतात, संवेदना जपतात आणि साध्या क्षणांतही आनंद शोधायला शिकवतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com