बी ग्रेसफुल ।स्वप्ना साने
स्वतःसाठी रोज १५ मिनिटे द्या, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसण्यासाठी काही होममेड पॅक सहज करता येतील. त्यासाठी काही टिप्स...
वर्किंग वूमन असो अथवा होममेकर असो; तिला तिच्या सगळ्या कामांतून स्वतःसाठी वेळ काढणे अन् तोही स्किन आणि हेअर केअरसाठी म्हणजे जरा अवघडच असते. बरं, पार्लरची अपॉइंटमेंट घ्यायची, तर ती आपल्या वेळेत मिळायला हवी. ते जुळून आले, तरी अचानक येणारे पाहुणे आणि ऐनवेळी निघणाऱ्या कामांमुळे तोही प्लॅन फिसकटण्याची शक्यता असते.
थोडक्यात, स्वतःला थोडे पॅम्पर करायचे, तर अडथळ्यांची शर्यत जिंकावी लागते. अशा अडथळ्यांना रोजच्या रोज सामोऱ्या जाणाऱ्या माझ्या वाचक-मैत्रिणींसाठी काही घरगुती टिप्स सांगते आहे, जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी थोडीफार स्किन आणि हेअर केअर घेता येईल. तासभर नाही, पण किमान १० ते १५ मिनिटे वेळ तर द्यावाच लागेल. आणि तेवढा वेळ स्वतःसाठी काढायलाच हवा.
त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसण्यासाठी काही होममेड पॅक सहज करता येतील -