

Natural Face Oils
esakal
सर्व प्रकारच्या त्वचेला उपयुक्त आणि टीनएजर्सपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होममेड फेस पॅक्स आणि फेस ऑइल्स वापरू शकतात. मात्र, लक्षात ठेवा, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर कोणतेही प्रॉडक्ट वापरायच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हल्ली बाजारात, अगदी ऑनलाइन बाजारातही वेगवेगळ्या प्रकारची भरपूर कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. हर्बल, आयुर्वेदिक, होममेड, ऑरगॅनिक, नॅचरल आणि इतर बऱ्याच वैशिष्ट्यांनी हायलाइट केलेली प्रॉडक्ट्स आपल्याला आकर्षित करत असतात. जणू काही ही प्रॉडक्ट्स खास आपल्याच त्वचेसाठी तयार केलेली असावीत. काही ब्रँड्स माहितीतले असतात, तर काही अगदीच नवीन, जस्ट लाँच झालेले. त्यांच्या किमतींमध्येही खूप फरक असतो. काही प्रॉडक्ट्सची किंमत साधारण, परवडणारी असते, तर काहींची खूप जास्त. अशा वेळी कोणते प्रॉडक्ट घ्यावे असा संभ्रम नक्कीच होतो. नैसर्गिक घटक असलेल्या महागड्या प्रॉडक्ट्सची पूर्ण रेंज जर घ्यायची नसेल, तर त्यातली काही प्रॉडक्ट्स तुम्ही तुमच्या घरी असलेले साहित्य वापरून फेस पॅक्स तयार करू शकता. या लेखात बघू या नैसर्गिक घटक वापरून महागड्या प्रॉडक्ट्सचा इफेक्ट देणाऱ्या, घरच्या घरी करता येतील अशा फेस पॅक्स आणि फेस ऑइल्सविषयी -