नेहा काडगांवकर
हल्ली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरची पाणीपुरी मिळते. ही चटपटीत पाणीपुरी बाहेर कितीही खाल्ली तर जीभ तृप्त होईल, पण मन तृप्त होत नाही. अशी सेम टू सेम पाणीपुरी घरी करायची असेल, तर या रेसिपींची नक्की मदत होईल...
पाणीपुरीच्या पुऱ्या
वाढप
साधारण ३० पुऱ्या
साहित्य
एक वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून खायचा सोडा, तळण्यासाठी तेल.