प्रा. डॉ. दीपक ताटपुजे
भारतात आणि जगभरात नावीन्यपूर्ण स्टार्टअप्समध्ये प्रचंड वाढ होत असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातही अभूतपूर्व वृद्धी होत आहे. सर्वसामान्य सामाजिक स्तरावरील समूहउद्योग परिवर्तनासाठी (क्लस्टर बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन विथ डीपटेक स्टार्टअप्स) एआयचा वापर येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने यामध्ये अनेक आंतरशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) करिअर संधी उपलब्ध होणार आहेत.
शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, संरक्षण, वित्त पुरवठा, वाहतूक आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयआधारित उपयोगी तंत्र विकसित करण्यात स्टार्टअप्स आघाडीवर आहेत. भारत आणि परदेशातील एआय स्टार्टअप्समध्ये अनेक नवीन रोमांचक करिअर पर्याय पुढील काळात अधोरेखित होत जातील.