राधिका परांजपे-खाडिलकर
लहानपणी आपण पोहायला शिकताना पहिल्यांदाच पाण्यात उडी मारतो, तेव्हा पोहायचा तसा थोडाफार सराव झालेला असला, तरी उडी मारण्याची ती पहिलीच वेळ असते.
उडी मारल्यावर अचानकच नाकातोंडात पाणी जायला लागतं. हातपाय मारायचं भान यायला काही क्षण लागतात. मग मात्र आपण जिवाच्या आकांतानं हातपाय चालवतो. पूर्ण शक्ती लावून तलावाच्या काठाशी पोहोचतो. त्याक्षणी झालेला निखळ आनंद ओसरल्यावर एक प्रकारची मनाला शांत करणारी समाधानाची भावना आपल्याला व्यापून टाकते.