लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त)
युद्धांचा इतिहास नेहमीच बदलत आलेला आहे. कधीकाळी तलवारी आणि धनुष्यबाणांनी लढली जाणारी युद्धे आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने लढली जात आहेत. यात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन, आणि सायबर युद्धांचा समावेश आहे. त्यामुळे फक्त जमीन, समुद्र, आकाशच नव्हे, तर त्यापुढे जाऊन समुद्र तळ आणि अवकाश यावर ज्याचे नियंत्रण असेल तोच जगावर राज्य करेल.
कृत्रिम बुद्धीमत्तेसारखं (एआय) अद्ययावत तंत्रज्ञान हे युद्ध आणि सुरक्षा क्षेत्रातील भविष्यासाठी अपरिहार्य आहे. सध्याच्या काळात अशा तंत्रज्ञानांना दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. त्यामुळे एआयचा नैतिक वापर करून भारताने जागतिक पातळीवर स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करायला हवंच, पण त्याच बरोबर बदलत्या काळातील आव्हानांचा मुकाबला करताना, अद्ययावत आणि झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा देशाची सुरक्षितता अभेद्य राखण्यासाठीदेखील कुशलतेने वापर करणे अत्यावश्यक आहे.