दिल्ली धडकन
महाराष्ट्रातील हॉटेल्सचा अभाव
दिल्लीत फिरताना आमच्यासारखे छोले-कुल्चेवाले अमाप दिसतील. छोले-कुल्चे हे दिल्लीचं राष्ट्रीय खाद्य आहे. इथं प्रत्येक राज्याची खासियत असलेली हॉटेल्स आहेत. ती तुडुंब चालतात. अपवाद फक्त महाराष्ट्राचा.
दिल्लीत मराठी मंडळी बहुसंख्येनं आहेत आणि दिवसागणिक आणखीही येताहेत. ही मंडळी दिल्लीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांत इथली खाद्यसंस्कृती अंगीकारतातही.
मात्र आपल्या गावच्या जेवणाची आठवण कोणाला येत नाही? पण इथल्या मराठी लोकांच्या नशिबी बाहेर जाऊन ‘घरचे’ रुचकर पदार्थ चाखण्याचं सुख नाही. त्यांना इतर राज्यातले पदार्थ चांगले लागतात याच वास्तवावर समाधान मानून घ्यावं लागतं.