संपादकीय
आजचा काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. मुलांचे मनोबल, त्यांची निश्चित दिशा आणि तार्किक क्षमता ही नव्या युगातील यशाची त्रिसूत्री ठरते आहे. करिअरच्या शर्यतीत प्रत्येक पावलावर मुलांना आणि पालक म्हणून आपल्यालाही सावध आणि सजग राहावे लागते. पण या सगळ्या प्रवासात जेव्हा मुलांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ येते, तेव्हा अनेक पालकांची स्वतःचीच द्विधा मनःस्थिती मुलांसाठी अडथळा म्हणून उभी राहते, हे आता समजून घेण्याची वेळ आली आहे.