Premium|Plastic Waste Management: प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचे पुणे मॉडेल

Pune can lead the fight against global plastic waste : प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाच्या लढ्यात पुणे हे एक प्रभावी आणि प्रेरणादायी शहर ठरू शकते
waste management pune
waste management puneEsakal
Updated on

लुबना अनंतकृष्णन

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण केवळ पर्यावरणविषयक चर्चा करीत बसू नये. आपल्या घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. कारण घरातून बाहेर टाकलेला कचरा कुठेही ‘गायब’ होत नाही, तो केवळ आपल्या नजरेआड जातो. पुण्यासारख्या शहरात हा कचरा अनेकांच्या उपजीविकेचा भाग आहे. तो वेचणारे, वर्गीकृत करणारे, प्रक्रियेसाठी नेणारे अनेक हात या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत. आपण घरातून काय आणि कसे टाकतो, यावर त्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा अवलंबून असते. कचरा व्यवस्थापन ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नाही. ती आपली सामूहिक जबाबदारी आहे.

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन ही अतिशय गुंतागुंतीची समस्या आहे. ती केवळ स्थानिक नाही, तर राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील दबावांमधून उभी राहिलेली आहे. तेल उत्खनन व पॉलिमर उत्पादनातील अतिरेक, पुनर्वापरास अत्यंत कठीण अशा पॉलिमरचा वाढता वापर, रिसायकलिंगसाठी आवश्यक गुंतवणुकीचा अभाव, उत्पादन बंदीविषयक नियमांच्या अंमलबजावणीत असलेल्या त्रुटी, अस्तित्वात असलेल्या नियमांची अपुरी अंमलबजावणी, वाढता ग्राहकवाद आणि डिस्पोजेबल प्लॅस्टिकचा सुळसुळाट हे सर्व घटक मिळून ही समस्या अधिकच गुंतागुंतीची करत आहेत.

ही केवळ कचरा व्यवस्थापनाची समस्या नसून, ती सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय स्तरांवर प्रभाव टाकणारी व्यापक समस्या आहे. त्यामुळे केवळ शहरे आणि नागरिक या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले, असा आरोप करणे योग्य ठरणार नाही. याप्रसंगी ‘रिसायकलिंग’ म्हणजे या समस्येवरील जादुई किंवा एकमेव उपाय असा गैरसमज टाळायला हवा. रिसायकलिंग हा फक्त उपलब्ध अनेक उपायांपैकी एक उपाय आहे. मात्र, रिसायकलिंग प्रक्रियेमध्ये शहरे आणि नागरिक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

पुणेकर याबाबतीत विशेष योगदान देऊ शकतात. कारण लोकजागर, स्वयंसेवी संस्था आणि काही प्रगत शहरी धोरणांच्या आधारावर पुणे शहराने अनेक बाबतींत देशातील इतर शहरांपेक्षा पुढाकार घेतला आहे. म्हणूनच प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाच्या लढ्यात पुणे हे एक प्रभावी आणि प्रेरणादायी शहर ठरू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com