cyber securityEsakal
साप्ताहिक
Cyber Fraud: सायबर गुन्ह्यांपासून तुम्ही स्वत:ची फसवणूक टाळू शकता; कशी?
Cyber Security: रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल्स आणि अन्य अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय हॉटस्पॉट्स उपलब्ध असतात. मात्र ही सार्वजनिक वाय-फाय कनेक्शन्स तुमच्या घरातील वाय-फायइतकी सुरक्षित असतीलच असे नाही...
स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे पाहता पाहता सायबरविश्वाची मुळे समाजात घट्ट रोवली गेली आहेत. आणि त्यातून निर्माण होणारी सायबर गुन्ह्यांची समस्याही दिवसेंदिवस वाढते आहे. बदलत्या काळाबरोबर आपल्या सवयीही आता हायटेक झाल्या आहेत. पत्रांची जागा ई-मेलने घेतली आहे. बँकेच्या व्यवहारांपासून ते जवळपास सर्वच खरेदी ऑनलाइन करण्याचा कल वाढतो आहे.
मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिले नाही, तर ती मूलभूत गरज झाली आहे. मात्र, या वाढत्या वापराबरोबर मोबाईलच्या सुरक्षित वापराबद्दलची माहिती अद्ययावत न ठेवल्याने फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांच्या सापळ्यात न अडकता सुरक्षित राहण्यासाठी योग्य खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी काही उपयोगी टिप्स...