career in sportsEsakal
साप्ताहिक
Premium|Career in Sports: क्रीडा क्षेत्र- वलयांकित व सन्मानपूर्वक करिअर!
Best career options in sports Industry : क्रीडा क्षेत्रातील करिअरद्वारे केवळ चांगला आर्थिक मोबदला मिळतो. एवढेच नव्हे तर प्रसिद्धी आणि जनमानसात ओळखही निर्माण होते
मिलिंद ढमढेरे
‘महेंद्रसिंग धोनी याच्याबरोबर एका कंपनीचा तीन वर्षांसाठी तीनशे कोटींचा करार’, ‘प्रो कबड्डी लीगमध्ये पाच खेळाडूंना प्रत्येकी दोन कोटी रुपयांची बोली’, ‘ऑलिंपिक पदके जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूवर भरपूर बक्षिसांची खैरात’ अशा बातम्या वाचल्यानंतर चाहत्यांच्या तोंडी ‘काय नशीबवान आहेत हे खेळाडू,’ असे उद्गार सहज येतात. खरंच गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंची अशी कोट्यवधी रुपयांची कमाई होत आहे. हे यश केवळ त्यांच्या प्रतिभेचे फळ नसून, खेळाच्या वाढत्या व्यावसायिक मूल्याचेही द्योतक आहे.