अविनाश धर्माधिकारी
मूल केवळ डॉक्टर-इंजिनिअर झालं तरच त्याचं करिअर चांगलं होईल, हा गैरसमज आहे. मुळात सर्वजण बुद्धिमान आहेत आणि सर्व करिअर्स समान आहेत हे एकदा लक्षात घेतलं, तर समोर येणारं सूत्र असतं - निवडलेल्या माझ्या क्षेत्रात मी उत्तम आणि प्रभावंत आहे का? ते होण्यासाठी प्रत्येकानं आवश्यक तपश्चर्या केली पाहिजे. प्रत्येकानं स्वतःवर करण्याची ही वैचारिक शस्त्रक्रिया आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी आयुष्याविषयीची जी स्वप्नं पडतात, आयुष्य कसं जगायचं आहे याविषयी आपण जे चिंतन करतो, त्याचा आयुष्याच्या जडणघडणीवर दीर्घकाळ परिणाम होत राहतो. ज्या अनेक अर्थांनी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ आहे, त्यातला एक अर्थ म्हणजे जीवनाची दिशा ठरवणं, त्यात करिअरही येतं.