फूडपॉइंट : प्रियंका येसेकर
वाढप
३ ते ४ व्यक्तींसाठी
साहित्य
एक मध्यम आकाराची ओल्या खोबऱ्याची वाटी, ७ ते ८ तुकडे सुके कोकम (अमसूल), ३ ते ४ लसूण पाकळ्या, १ हिरवी मिरची (ऐच्छिक), मीठ चवीनुसार, कोथिंबीर सजावटीसाठी, अर्धा टीस्पून जिरे, १ चिमूट हिंग.
कृती
सर्वप्रथम कोकमाचे तुकडे अर्धा कप कोमट पाण्यात १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवावेत. नंतर ते चांगले चोळून त्यांचा रस काढावा. हाच कोकमाचा अर्क होतो. ओले खोबरे, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून वाटून घ्यावे. ही पेस्ट गाळून प्रथम नारळाचे दूध काढावे (हवे असल्यास दुसऱ्यांदा थोडे पाणी घालून आणखी दूध काढता येईल). नंतर कोकमाचा रस आणि नारळाचे दूध एकत्र करून ढवळून घ्यावे. त्यात मीठ आणि हिंग घालून नीट मिसळावे. वरून कोथिंबीर घालून गार सोलकढी सर्व्ह करावी.
टीप : सोलकढी थंडगार प्यायल्यास अधिक चविष्ट लागते. पचनासाठी अत्यंत फायदेशीर असते. काही घरांमध्ये फोडणी न देता साधीच सोलकढी केली जाते.