आरती पागे
मलई कुल्फी
साहित्य
एक लिटर म्हशीचे दूध, एक तृतीयांश कप साखर, पाव कप मिल्क पावडर, १ टेबलस्पून थंडाई प्रिमिक्स, अर्धा टीस्पून वेलची-जायफळ पूड.
कृती
प्रथम एक कप दूध बाजूला काढून ठेवावे. उरलेले दूध जड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर उकळत ठेवावे. पातेले जाड बुडाचे नसेल तर त्याखाली तवा ठेवावा, जेणेकरून दूध खाली लागणार नाही. एकीकडे एका पॅनमध्ये साखर घेऊन ती मंद गॅसवर वितळू द्यावी. साखर वितळायला लागल्यावरच हलवावी. साखर पूर्ण वितळून ब्राऊनिश रंग आल्यावर गॅस बंद करावा. हे कॅरॅमल तयार झाले. नंतर उकळत्या दुधात हळूहळू कॅरॅमल घालावे आणि मिश्रण सतत हलवत राहावे.