Winter Food Recipies
Winter Food Recipiesesakal

Winter Food Recipies : हिवाळ्यात खायलाच हवेत पोह्याचे कटलेट्स आणि काकडीचे पोहे, जाणून घ्या रेसिपीज

हिवाळ्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडते. हेल्दी सूप्स, विविध प्रकारचे पोहे, कटलेट्स आणि करी सारख्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हरकत नाही.
Published on

(लेखिका - सुप्रिया खासनीस)

पोह्याचे कटलेट

वाढप - ८-१० कटलेट

साहित्य

दोन ते तीन बटाटे, १ वाटी जाड पोहे, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा धरे-जिरे पूड, ३-४ हिरव्या मिरच्या, पाव वाटी गाजर कीस, चवीनुसार मीठ, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मटार दाणे (ऐच्छिक), तळण्यासाठी तेल.

कृती

बटाटे उकडून घ्यावेत. गार झाल्यावर किसून घ्यावेत. त्यात धने-जिरे पूड, गाजर कीस, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण पेस्ट, मिरच्यांचे तुकडे घालावेत. आवडत असल्यास थोडे मटार दाणे घालावेत. नंतर एक वाटी पोह्यांची मिक्सरमधून पूड करून घ्यावी. तयार मिश्रणात पोह्यांची पूड घालून मिश्रण एकजीव करावे. तयार मिश्रणाचे पाहिजे त्या आकाराचे कटलेट करून तळावेत. सॉस किंवा चटणीबरोबर खायला द्यावेत.

काकडीचे पोहे

वाढप - ६-८ व्यक्तींसाठी

साहित्य

अर्धा किलो पातळ पोहे, ४ मोठ्या काकड्या, १ वाटी डाळे, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, १ नारळ, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ लिंबे, चवीनुसार मीठ व साखर, फोडणीचे साहित्य.

कृती

प्रथम काकड्या कोचून घ्याव्यात. नारळ खोवून घ्यावा. डाळ्याचे साधारण जाडसर कूट करावे. एका पातेल्यात प्रथम काकडीचा थर लावावा. नंतर त्यावर दुसरा थर पोह्यांचा लावावा. त्यावर खोबऱ्याचा थर लावावा. याप्रमाणे थर लावत जावे.

शेवटी डाळ्याचा कूट पसरून मिश्रण दोन तास दडपून ठेवावे. दोन तासांनंतर त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर घालावी. नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग वगैरे घालून तेलाची खमंग फोडणी करावी व ती घालावी. सर्व छान एकत्र करून खावयास द्यावे.

Winter Food Recipies
Winter Food Recipies: भाजलेले सॅल्मन फिश ते टोमॅटो तुळस सूप, हिवाळ्यासाठी खास हेल्दी सूप्स, सॅलड आणि करी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com