old cloth design
Esakal
राधिका परांजपे-खाडिलकर
अनेकदा आपल्याला प्लेन कपड्यांचा कंटाळा येतो. मनासारख्या डिझाईनचे कपडे मिळत नाहीत किंवा एखादा जुना झालेला ड्रेस टाकून देणं जिवावर येतं. अशा वेळी घरीच एखादा ड्रेस किंवा टी-शर्ट कस्टमाइज करून पेंट करणं हा चांगला पर्याय ठरतो. घरच्या घरी कपडे पेंट करण्याआधी या टिप्स जरूर फॉलो करा.
कपडे घरी डाय करणं हे तसं कष्टाचं काम. योग्य साधनं नसतील तर कपडे वायाही जाऊ शकतात. पण काही उपाय केले तर घरीही कपड्यांवर मस्त डिझाईन डाय करता येतं.
साहित्य घेतलं का?
रंग (डाय) : कपडे डाय करण्यासाठीच्या रंगांनी बाजारपेठ भरलेली आहे. हल्ली अनेक प्रकारचे रंग मिळतात. नैसर्गिक, कृत्रिम, थंड पाण्यात विरघळणारे, फॅब्रिक-फिक्स, ग्लिटर अशी विविधता उपलब्ध असते.