पाठीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्ती ट्रेकिंग करू शकतात का?

ट्रे‍कमध्ये येणारी आव्हाने थोडी वेगळी असतात, म्हणूनच शारीरिक तयारीही करावी लागते.
trekking fitness
trekking fitnessesakal

डॉ. तन्मयी पोरे

ट्रेकिंगला जाणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. ट्रेकिंगचे वेड गेल्या काही वर्षांत खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, शारीरिक तयारी नसेल तर मोठमोठे ट्रेक करताना त्रास होऊ शकतो.

ट्रेकिंगचा आनंददायी अनुभव त्रासदायक ठरू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. ट्रे‍कमध्ये येणारी आव्हाने थोडी वेगळी असतात, म्हणूनच शारीरिक तयारीही करावी लागते. एक ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट (orthopaedic physiotherapist) असल्याने ट्रेकबाबतीत मला अनेकजण काही ठरावीक प्रश्न नेहमी विचारतात.

हाताची पाच बोटे जशी वेगवेगळी असतात, तशीच प्रत्येकाची शारीरिक ठेवण आणि फिटनेस लेव्हल वेगवेगळी असते. त्यामुळे ट्रेकसाठी प्रत्येकाला सारखीच तयारी करावी लागेल असे नसते.

trekking fitness
Physical Fitness : स्वत:साठी फक्त एक तास...सुदृढ आरोग्यासाठी अनेक ‘पॅटर्न’!

नेहमी विचारले जाणारे प्रश्‍न काहीसे असे असतात...

ट्रेकिंगसाठी कोणत्या शारीरिक बाबींवर काम करायला हवे?

उत्तर : ट्रेकिंग म्हणजे सतत आव्हानांशी सामना! असंख्य गोष्टींचा त्यात समावेश होतो. तुमची स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन अशा सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ह्या गोष्टी ट्रेकच्या प्रकारावर, अंतर-उंची आणि वेळ यावरसुद्धा अवलंबून असतात.

जर अंतर आणि उंची कमी असेल तर तो ट्रेक सर्वसामान्यपणे फिट असणाऱ्या सगळ्यांना करता येतो. परंतु ट्रेक जर समुद्रसपाटीपासून उंचीवर आणि जास्त अंतराचा असेल तर तुमचा फिटनेस पणाला लागतो.

त्यामुळे ट्रेकिंगची सुरुवात करण्याआधी तुम्हाला स्वतःची फिटनेस लेव्हल माहीत असणे गरजेचे आहे. कोणत्या शारीरिक बाबींवर काम करायला हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी फिजिओथेरपिस्टचा सल्ला उपयोगी पडतो.

ट्रेकिंगआधी साधारण किती दिवस फिजिओथेरपी सुरू करणे आवश्यक आहे?

उत्तर : प्री-ट्रेक फिजिओथेरपी सुरू करण्यासाठी अशी एक ठरावीक टाइमलाइन देता येत नाही. ह्याचे कारण असे, की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते, ठेवण वेगळी असते.

त्यामुळे आपल्यासाठी कोणता व्यायाम योग्य आहे, हे जाणून घेण्यासाठी किमान तीन महिने आधी फिजिओथेरपिस्टला भेटणे गरजेचे आहे. ह्या कालावधीत तुमची फिटनेस पातळी तपासून त्यानुसार व्यायाम ठरवून दिले जातील.

ह्या व्यायामात सातत्य असणे महत्त्वाचे आहे. व्यायामाची गोळी रोज घ्यायलाच हवी! ट्रेकिंग करून आल्यानंतरही व्यायाम सुरू ठेवायला हरकत नाही. त्यामुळे ट्रेकनंतर होणारा शारीरिक त्रास कमी व्हायला मदत होईल.

(Latest Marathi article about trekking)

trekking fitness
Trekking Tips| ट्रेकिंगचे नियोजन करताय? मग लक्षात ठेवा 4 टिप्स

पाठीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्ती ट्रेकिंग करू शकतात का?

उत्तर : जर योग्य मार्गदर्शन मिळाले आणि आवश्यक ती खबरदारी घेतली तर पाठीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास असला तरी नक्कीच ट्रेकिंग करता येते.

ट्रेक सुरू करण्यापूर्वी पाठ किंवा गुडघे का दुखतात, याचे कारण आधी समजून घेणे गरजेचे आहे.

साधारणपणे संधिवात, स्लिप्ड डिस्क, सांध्यांची झीज आणि स्नायूंमधला असमतोल अशा कारणांमुळे अशी दुखणी उद्‍भवतात.

यातले नक्की कोणते कारण आहे हे जाणून घ्यायला ट्रेकआधी फिजिओथेरपिस्टला अवश्य भेटा.

संपूर्ण शरीराची ताकद, लवचिकता आणि बॅलन्स तपासून घ्या. मगच तुम्ही पाठ आणि गुडघेदुखीवर मात करून ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकाल.

बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीला ट्रेकिंग सहज जमू शकेल का?

उत्तर : हो अगदीच! बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीही सहज ट्रेक करू शकतात, परंतु त्यासाठी तयारी करून काळजीपूर्वक सुरुवात करायला हवी.

ट्रेकिंगमध्ये शारीरिक आव्हाने येत असतात. त्यामुळे नियमित व्यायामाची सवय नसलेल्यांनी ट्रेकपूर्वी हळूहळू व्यायामाची पातळी वाढवणे आवश्यक आहे. तुमच्या फिटनेस पातळीनुसार

कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे फिजिओथेरपिस्ट सांगू शकतात. उदाहरणार्थ, काहींची स्ट्रेंथ कमी असते, तर काहींचा स्टॅमिना कमी पडतो.

काहींचे सांधे कडक असतात तर काहींचे फारच लवचिक. ह्या गोष्टींची तपासणी करून मगच त्या दृष्टीने ट्रेनिंग सुरू करायला हवे. कारण ‘वन शू फिट्स फॉर ऑल’ हा नियम इथे लागू होत नाही!

(How to prepare yourself for trekking?)

trekking fitness
Hardest Trek: भारतातील सर्वात कठीण ट्रेक जे फक्त प्रोफेशनल ट्रेकर्स सर करू शकतात.

ट्रेकदरम्यान ‘हाय रिस्क’ आजार असलेल्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी?

उत्तर : हाय रिस्क व्यक्तींमध्ये हृदय आणि फुप्फुसांसंदर्भातील आजार किंवा त्या निगडित आधी शस्त्रक्रिया झालेले, तसेच वृद्ध मंडळी, नुकतीच सांध्यांना दुखापत झालेले लोक यांचा समावेश होतो.

ट्रेकचे नियोजन करण्याआधी अशा लोकांनी मेडिकल क्लिअरन्स म्हणजेच संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी.

ईसीजी, टूडी एको, लंग कपॅसिटी, ब्लड ग्लुकोज इत्यादी तपासण्या करून घ्याव्यात. डॉक्टरांना विचारून औषधांचे डोस जवळ ठेवावेत.

दुखणे गंभीर नसेल तर ट्रेकमध्ये त्रास होण्याची शक्यता कमी असते. परंतु, तरीही डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊनच ट्रेकचे नियोजन करावे.

ट्रेकनंतरचा थकवा घालवण्यासाठी फिजिओथेरपीची कशी मदत होते?

उत्तर : ट्रेकनंतर आलेला थकवा, सांधेदुखी दूर करण्यासाठी फिजिओथेरपीमध्ये अनेक उपचार उपलब्ध आहेत. घट्ट झालेल्या स्नायूंसाठी शॉकवेव्ह थेरपी असते. त्यामध्ये स्नायूंना शॉकवेव्ह देऊन ते पूर्ववत केले जातात.

सांधे खूप दुखत असतील तर त्यासाठी हाय पॉवर लेझर, कॉम्बिनेशन थेपरी टेन्ससारख्या उपकरणांचा वापर करता येतो. या थेरपींबरोबरच काही सोपे व्यायाम आणि स्ट्रेचेस शिकवले जातात. या सगळ्यांमुळे ट्रेकनंतर आलेला थकवा पळून जातो.

---------------------

(are you physically fit for trekking?)

trekking fitness
Physiotherapy: फिजिओथेरपी म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील थेरपीबद्दल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com