देशातील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल लॉ स्कूल या महत्त्वाच्या विधी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी कॉमन ॲडमिशन लॉ टेस्ट (क्लॅट) घेतली जाते. या परीक्षेद्वारे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. देशातील २४ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटींमधील बी.ए.-एलएलबी आणि बीबीए-एलएलबी या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी क्लॅट (अंडर ग्रॅज्युएट) परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
पात्रता ः या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुला संवर्ग, इतर मागास संवर्ग आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतील बारावीमध्ये ४५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही अट ४० टक्यांची आहे.
परीक्षा पद्धती ः ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची ऑफलाइन परीक्षा आहे. पेपरमध्ये १२० प्रश्न विचारले जातात. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असतो. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी एक गुण दिला जातो. चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण कपात केली जाते. याचा अर्थ चार प्रश्नांची उत्तरे चुकल्यास १ गुण कमी होतो. या पेपरमध्ये पुढील विषय घटकांवर प्रश्न विचारले जातात -