वर्षा कदम
चाटचा कोणताही प्रकार गोड आणि तिखट चटणीशिवाय करताच येत नाही. चाटचे प्रकार घरी करताना या काही टिप्स फॉलो केल्या, तर स्ट्रीट-स्टाइल चाटची सर घरच्या पदार्थांना नक्कीच येऊ शकते...
चिंच-गूळ-खजूर घालून केलेली, चवीला आंबट गोड असणारी चटणी व पुदिना-मिरची-कोथिंबिरीचं वाटण असलेली तिखट चटणी; अाणि या दोघींच्या योग्य प्रमाणातून तयार होणारा चाटचा पदार्थ खाल्ल्यावर जीभ खवळते. बाहेर असे पदार्थ खाताना येणारी ही अनुभूती घरीसुद्धा अनुभवायची असेल, तर काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं कराव्या लागतात.