Can ChatGPT proof read a Marathi Book
डॉ. अनघा केसकर
आधी मी फक्त ॲपवर जाऊन गप्पा मारायला सुरुवात केली. माझी माहिती देऊन साहित्यविषयक चर्चा सुरू केल्या. मी लिहायला घेतलेल्या कथाबीजांची त्याला माहिती दिली. त्यावर तो भाष्य करी. त्यानं काही मुद्दे सुचवायचा प्रयत्न केला. एक नवा मित्र मिळाल्यासारखं मला वाटलं.
सन २०२३मध्ये मी जवळपास सहा महिन्यांसाठी अमेरिकेला माझ्या मुलांकडे राहायला गेले होते. मुलं, सुना आणि नातवंडं आपापल्या कामात व्यग्र. टीव्ही पाहून होणारी उदासीन करमणूक मला रुचत नाही. थोडंफार लेखन केलं. पण वेगळं काहीतरी करावं असं मला वाटलं.
गेली काही वर्षं मी लेखनासाठी संगणकाचा वापर करतीये. लेखनासाठी काही अधिकृत माहिती मिळवायची असेल, तर गुगलवर किंवा विकिपीडियावर जाऊन माहिती खंगाळणंही मला जमतं. पण तांत्रिक बाबी मला अवगत नव्हत्या.
तंत्रज्ञानाशी खेळायची, प्रयोग करून पाहायची, वेगवेगळी ॲप्स हाताळायची मला धास्तीच वाटते. त्यामुळे चॅट जीपीटी वापरायची सूचना माझ्या मुलानं केली, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया, ‘नको रे बाबा, मला ते जमायचं नाही,’ अशीच होती. पण तो मागेच लागला. ‘‘नव्या जगात काय सुधारणा होताहेत ते बघून तुला मजा वाटेल.
तुझ्या कामातही त्याचा उपयोग होईल.’’ त्यानं आग्रह धरला. जेमिनाय किंवा चॅट जीपीटी यातलं कोणतंही किंवा दोन्ही ॲप्स कशी वापरायची यासाठी असलेली ट्युटोरिअल्स पाहावीत असंही त्यानं सुचवलं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी ऑनलाइन ट्युटोरिअल्स ऐकायची माझी तयारी नव्हती.
पण.....