Cricket : जगज्जेते नेतृत्व असले, तरी धोनीसुद्धा अजेय कर्णधार नव्हता..

पराभूत झालेल्या भारतीय संघाला सहानुभूतीच जास्त मिळाली, टीकेचे धनी व्हावे लागले नाही.
PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Video
PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Videosakal

किशोर पेटकर

कर्णधार या नात्याने धोनीचे संघ व्यवस्थापन लाजवाब होते, त्याच्यासारखा तल्लख कर्णधार विरळाच. जगज्जेते नेतृत्व असले, तरी धोनीसुद्धा अजेय कर्णधार नव्हता. त्यालाही आयसीसीच्या काही स्पर्धांत अपयश आले, मात्र राखेतून भरारी घेण्याची जिद्द, दृढनिश्चय आणि सहकाऱ्यांना प्रेरित करण्याची त्याचे कौशल्य अफलातून ठरले. भारताला आता धोनीसारखाच धोरणी कर्णधार हवा आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत घरच्या मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत अपेक्षांच्या दबावाखाली झुकला.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जगज्जेतेपदाचा मान मिळविला. अहमदाबाद येथील भव्य-दिव्य नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित लाखभर क्रिकेटप्रेमी, तसेच थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या अब्जावधी देशवासीयांची निराशा झाली खरी, मात्र पराभूत झालेल्या भारतीय संघाला सहानुभूतीच जास्त मिळाली, टीकेचे धनी व्हावे लागले नाही.

याचे कारण म्हणजे, अंतिम फेरी गाठताना भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकले. त्यांची वाटचाल दिमाखदार होती, फक्त १९ नोव्हेंबर हा दिवस पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाचा ठरला.

कर्णधार रोहित शर्मासह साऱ्या भारतीय खेळाडूंनी पाणावलेल्या डोळ्यांसह ऑसी संघाला विश्वकरंडकासह जल्लोष करताना पाहिले.

भारताच्या पराभवाला कारणे कितीतरी असतील, पण स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वगुणांवर संशय घेण्यात आला नाही. माजी दिग्गज क्रिकेटपटूंनाही कर्णधाराने चूक केल्याचे जाणवले नाही.

फलंदाजीत रोहितची आक्रमकता खुलली. रोहित सध्या ३६ वर्षांचा आहे. एकदिवसीय सामन्यांची पुढील विश्वकरंडक स्पर्धा २०२७ खेळली जाईल, तेव्हा मुंबईचा हा शैलीदार फलंदाज ४० वर्षांचा होईल. तोपर्यंत तो क्रिकेट खेळत राहणार का?

फलंदाजीतील फॉर्म आणि नेतृत्व यांची यशस्वीपणे सांगड घालणे त्याला पुढील चार वर्षांत शक्य होईल का...? प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.

क्रिकेटमध्ये सारे अविश्वसनीय असते, त्यामुळे वयाच्या चाळिसाव्या वर्षी रोहित विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मैदानात उतरू शकतो, पण ही शक्यता जास्त प्रमाणात अंधूकच दिसते. अशावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) चाणाक्ष, धोरणी कर्णधाराचा शोध आतापासूनच घ्यावा लागेल.

टी-२० क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाते, पण त्याची तंदुरुस्ती नेहमीच आड येते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवची कर्णधार या नात्याने चाचपणी झाली.

मध्यंतरी के.एल. राहुल याच्याकडेही कर्णधार म्हणून पाहिले गेले. पुढील वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. रोहितने स्पष्टपणे सांगितलेले नाही, पण संकेतानुसार तो आता टी-२० क्रिकेट खेळणे कमी करू शकतो. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन विचार करून हुशार, कल्पक कर्णधारावर शिक्कामोर्तब करावेच लागेल.

ऑस्ट्रेलियाने झटपट क्रिकेटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांचा प्रयोग करून पाहिले, पण ते असफल ठरल्यानंतर कसोटी कर्णधार पॅट कमिन्सकडे एकदिवसीय क्रिकेटमधील नेतृत्वाचा मोठा अनुभव नसतानाही विश्वकरंडक स्पर्धेसाठी कर्णधारपद देण्यात आले.

ऑस्ट्रेलियाचा संघ भारतातील स्पर्धेत अडखळत खेळूनही विश्वविजेता बनला. त्याचे श्रेय संघाला योग्य दिशा दाखविणाऱ्या प्रेरक कमिन्सकडेही जाते. गेल्या वर्षी फेब्रुवारीत रोहित शर्मा भारताचा कसोटी क्रिकेटमधील पूर्णवेळ कर्णधार बनला.

त्यापूर्वी डिसेंबर २०२१मध्ये त्याच्याकडे व्हाईट बॉल क्रिकेटची जबाबदारी देण्यात आली होती. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनल्यानंतर रोहितला पक्के नियोजन करणे शक्य झाले आणि त्या जोरावर भारताला विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतपर्यंत मजल मारता आली हे स्पष्टच आहे.

PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Video
Jay Shah Sri Lanka Cricket : श्रीलंका क्रिकेट जय शहा चालवतात... लंकेचा माजी कर्णधार हे काय म्हणतोय?

हवा धोनीच्या तोडीचा कर्णधार

भारतीय क्रिकेट संघ कर्णधार म्हटले, सर्वप्रथम डोळ्यांसमोर महेंद्रसिंग धोनीचाच पराक्रम येतो. १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने अनपेक्षितपणे विश्वकरंडक उंचावला. त्यानंतर भारतात क्रिकेट खूपच बहरले. खेळाची लोकप्रियता गगनाला भिडली.

मात्र क्रिकेट विश्वकरंडक पुन्हा देशात आणण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. १९८७ आणि १९९६ साली विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत घरच्या मैदानावर खेळूनही पुढे जाता आले नाही. २००७ साली वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या विश्वकरंडकात साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील संघावर आली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली.

नवोदित, शांत अशा महेंद्रसिंग धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली, तेव्हा सारेच आश्चर्यचकीत झाले होते. मात्र झारखंडमधील रांचीच्या या लांब केसवाल्या क्रिकेटपटूने चमत्कार घडविला. वेस्ट इंडीजमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर रांची येथील त्याच्या घरावर विघ्नसंतोषी लोकांनी हल्ला चढवून मोडतोड केली होती.

याच धोनीने कर्णधार या नात्याने भारताला वेगळ्याच उंचीवर नेले. धोनी कर्णधार असताना भारताने आयसीसीच्या चार स्पर्धांच्या अंतिम लढतीत दोन विश्वकरंडकांसह तीन वेळा बाजी मारली. इतर कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धांतील आठ अंतिम लढती खेळला, पण फक्त एकदाच जिंकू शकला.

सन २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-२० विश्वकरंडकात धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले. कपिल देवच्या संघाने बजावलेल्या पराक्रमानंतर धोनीच्या संघाने विश्वकरंडकाची प्रतीक्षा तब्बल २४ वर्षांनी संपुष्टात आणली.

धोनी व त्याचे सहकारी एवढ्यावरच थांबले नाहीत. २०११ साली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने आणखी एक विश्वकरंडक उंचावला. दुसऱ्यांदा एकदिवसीय सामन्यांतील क्रिकेट जगज्जेतेपद भारताला प्राप्त झाले.

त्यानंतर २०१३ साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चँपियन्स करंडक पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धेत भारताचे ते शेवटचे यश ठरले.

कर्णधार या नात्याने धोनीचे संघ व्यवस्थापन लाजवाब होते, त्याच्यासारखा तल्लख कर्णधार विरळाच. २०१५ साली त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणखी एक विश्वकरंडक खेळला, परंतु उपांत्य फेरी पार करता आली नाही.

त्यापूर्वी २०१४ साली धोनीच्या संघाला टी-२० विश्वकरंडकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१६मध्ये टी-२० विश्वकरंडकात भारताने उपांत्य फेरी गाठली. विश्वकरंडक स्पर्धेत कर्णधार या नात्याने धोनीची ही शेवटची स्पर्धा ठरली. २०१७ साली चँपियन्स करंडकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्धच्या पराभव भारताच्या जिव्हारी लागला.

कर्णधार या नात्याने धोनीची ती शेवटची आयसीसी स्पर्धा ठरली. जगज्जेते नेतृत्व असले, तरी धोनीसुद्धा अजेय कर्णधार नव्हता. त्यालाही आयसीसीच्या काही स्पर्धांत अपयश आले, मात्र राखेतून भरारी घेण्याची जिद्द, दृढनिश्चय आणि सहकाऱ्यांना प्रेरित करण्याची त्याचे कौशल्य अफलातून ठरले. भारताला आता धोनीसारखाच धोरणी कर्णधार हवा आहे.

PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Video
Football Tournament : फुटबॉल सामन्यात प्रथमच होणार 'टायब्रेकर'चा अवलंब; KSA लीगचे वेळापत्रक जाहीर

विराटला नेतृत्व झेपले नाही

विराट कोहली विक्रमी क्रिकेटपटू आहे, परंतु कर्णधार या नात्याने त्याची कामगिरी डावीच ठरली. विश्वकरंडकात तो संघनेता या नात्याने विजयी पताका फडकवू शकला नाही. २०१९ साली विश्वकरंडक स्पर्धेत विराटने कर्णधार या नात्याने संघाला दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. फलंदाजीत तो यशस्वी ठरला, परंतु भारताचे जगज्जेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले.

२०२१ साली जागतिक कसोटी अजिंक्यपद लढतीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला, तेव्हाही विराट कर्णधार होता. २०२१ साली टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतावर साखळी फेरीत गारद होण्याची नामुष्की आली आणि कर्णधार या नात्याने विराटचा पडता काळ सुरू झाला. महान फलंदाज चांगले कर्णधार ठरू शकत नाहीत का, हा प्रश्न सदोदित विचारला जातो.

सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे दैवी देणगी लाभलेले असामान्य क्रिकेटपटू, पण कर्णधार या नात्याने ते क्वचितच प्रकाशमान झाले. पाकिस्तानचा सध्याचा हुकमी फलंदाज बाबर आझम याचीही तीच गत.

यावेळच्या विश्वकरंडकात पाकिस्तानला अपयश आले. आपल्या डोक्यावर खापर फुटण्यापूर्वीच बाबरने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील संघ नेतृत्वावर पाणी सोडले, असो... विराटनंतर रोहित शर्माकडे भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी चालून आली. २०२२मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

कर्णधार या नात्याने रोहितची ती पहिलीच आयसीसी स्पर्धा होती. यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाचा संघ भारी ठरला.

PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Video
World Cup Cricket 2023 : विश्‍वकरंडक महामुकाबला! एकतर्फी पराभवाने निराशा, क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर पाणी

पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडीज-अमेरिकेत टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये संभाव्य विजेता सांगणे म्हणजे जोखीमच असते. नव्या दमाचे भारतीय क्रिकेटपटू नावारूपास येत आहेत, मात्र ते टी-२० विश्वकरंडक जिंकून देऊ शकतील असे म्हटल्यास या खेळाडूंना अपेक्षांच्या दबावाखाली ठेवल्यागत होईल.

२०२७ सालची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा दक्षिण आफ्रिका-झिंबाब्वे-नामीबियात होणार आहे. आणखी चार वर्षांनी जगज्जेते बनण्याइतपत मजल गाठण्यासाठी आतापासून कणखर कर्णधाराला शोधून भक्कम संघ बांधणी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला प्रयत्न करावेच लागतील.

---------------

PM Narendra Modi Met Indian Team Praised Rohit Sharma Virat Kohli And Rahul Dravid Video
Cricket News : 'आता क्रिकेट खेळताना पूर्वीसारखी मज्जा...' दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com