Premium |Iconic Bikes in Hollywood Movies : हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत मोठ्या पडद्यावर अमर ठरलेल्या आयकॉनिक बाइक्सची सफर

Influence of Motorcycles on Pop Culture : चित्रपटांमुळे काही बाइक्स अजरामर झाल्या, तर काही बाइक्सनी सिनेकथानकाला उंचीवर नेले; चार्ली चॅप्लिनपासून बॉलिवूडपर्यंतच्या या रंजक प्रवासात बाइक्सनी केवळ पडद्यावरच नव्हे, तर चाहत्यांच्या मनातही कायमचे स्थान निर्माण केले असून हा लेख त्याचाच आढावा घेतो.
Iconic Bikes in Hollywood Movies

Iconic Bikes in Hollywood Movies

esakal

Updated on

राधिका परांजपे-खाडिलकर

बाइक्सच्या बाबतीतलं मला फारसं काही कळत नसलं, त्या चालवताही येत नसल्या, तरी कुठल्याही चित्रपटात पहिल्या त्याच नोटिस होतात. काही चित्रपट बाइक्समुळे लक्षात राहिले, तर काही बाइक्स चित्रपटांमुळे... बाइक चालवणं तर सोडाच, पण बाइकवर मागं बसायलाही न आवडणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला बाइक्स ‘बघायला’ शिकवलं ते या चित्रपटांनीच!

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आजवर भरपूर प्रयोग झाले. त्यातले काही फसले तर काही अजरामर झाले. अजरामर प्रयोगांतून अनेक ट्रेंडही सेट झाले. बाइक्स हा दर्दी बाइकप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे साहजिकच प्रयोगांच्या नावाखाली चित्रपटसृष्टीनंही या विषयाला हात घालत बाइक्सशी मैत्री केली. कधी कस्टमाइज्ड बाइक्स, कधी क्लासिक बाइक्स, तर कधी कथानकांमध्येच बाइकला महत्त्वाची भूमिका देऊन सिनेसृष्टीनं बाइकला आणि बाइकप्रेमींना आपलंसं केलं. आपल्या आवडत्या बाइकला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठी चित्रपटगृहांत होऊ लागलेली गर्दी आजही ओसरायचं नाव घेत नाही. अशा काही बाइक्सची सफर, ज्यांनी मोठ्या पडद्यावरून थेट चाहत्यांच्या मनात स्टंट जंप मारली!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com