शिक्षण मंत्रालयामार्फत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना, विज्ञान विषयातील संशोधनात्मक अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली. या संस्थेचे पुणे, मोहाली, कोलकाता, बेहरामपूर, तिरुपती, भोपाळ आणि तिरुवनंतपुरम येथे कॅम्पस आहेत.
कॅम्पस आणि अभ्यासक्रम
वेगवेगळ्या आयसर कॅम्पसमध्ये पुढील विषयांत बी.एस.-एम.एस. (बॅचलर ऑफ सायन्स - मास्टर ऑफ सायन्स) अभ्यासक्रम करता येतात.