Premium|Immanuel Kant Philosophy : इमॅन्युअल कांटचे तत्त्वज्ञान आणि नैतिकतेचा जागतिक शांततेशी संबंध

Kant Moral Philosophy : इमॅन्युअल कांटच्या तत्त्वज्ञानात सार्वत्रिक नैतिक तत्त्वे आणि प्रत्यक्ष अनुभवातील मानवी कृती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे जागतिक शांततेच्या विचारांवरही त्याचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो.
Immanuel Kant Philosophy

Immanuel Kant Philosophy

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

कांटच्या अभ्यासकांकडून प्रमाद घडत आलेला आहे. एकीकडे अनुभवपूर्व/ अनुभवातीत अशी सार्वत्रिक तत्त्वे आणि दुसरीकडे त्यांचे अनुभवविश्वातील कर्मात रूपांतर या दोन्ही स्तरांचे स्वतंत्रपणे विवेचन करून त्यांची सांधेजोड करायची हे काही सोपे काम नाही. कांटला नेमके तेच करायचे आहे. या कार्याची आवश्यकता व रूपरेषा त्याच्या प्रसिद्ध Groundwork for the Metaphysics of Morals या पुस्तकात सूचित झालेली दिसून येते.

‘विश्वाचे आर्त’ या महाप्रकल्पामधील एका निर्णायक टप्प्यावर असताना काही गोष्टींचा खुलासा करायची आवश्यकता वाटते. तो टप्पा म्हणजे अर्थातच प्रसिद्ध व प्रभावी तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांटचे तत्त्वज्ञान. ‘विश्वाचे आर्त’ स्वभावतःच एक आंतरविद्याशाखीय प्रकल्प आहे, किंबहुना तसे असणे ही त्याची अंगभूत गरज आणि अनिवार्यता आहे हे जसे वेगळे सांगायची गरज आहे. तसेच या विद्यांमध्ये तत्त्वज्ञान या विद्याशाखेला स्थान द्यावे लागणार हेसुद्धा स्पष्ट आहे. या तत्त्वज्ञानात स्थूलमानाने पौर्वात्य आणि पाश्चिमात्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारप्रवाहांना स्थान असणेही तितकेच गरजेचे आहे. आता या विचारप्रवाहांमध्ये विशेषतः पाश्चात्त्यांचा विचार करताना कांट एखाद्या दीपस्तंभासारखा वाटतो. अगदी बोट ठेवूनच सांगायचे झाले, तर जागतिक पातळीवरील शांतीचा विचार व व्यवहार ज्यांनी केला, त्या वूड्रो विल्सन आणि हेन्री किसिंजर यांच्यावरील कांटचा प्रभाव कोणीच नाकारू शकत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com