Premium|Immanuel Kant : रुसोचा कांटवर प्रभाव होता, पण तो अनुयायी नव्हता; मानवी विचारांवर नेमका काय परिणाम झाला?

Kant’s Intellectual Respect for Rousseau : रुसोच्या विचारांनी कांटला प्रभावित केले, पण तो रुसोचा अनुयायी झाला नाही; मानवी स्वभाव आणि नीतिविचारातील रुसोच्या क्रांतिकारी योगदानाचे कांटने स्वतंत्रपणे महत्त्व मान्य केले.
Immanuel Kant

Immanuel Kant

esakal

Updated on: 

डॉ. सदानंद मोरे

माणूस नावाचे एकूण जे प्रकरण आहे तेच कांटच्या एकूण आस्थेचा व चिंतनाचा विषय होता आणि त्याला त्याकडे खेचण्याचे काम रुसोच्या ग्रंथांनी केले म्हणून त्याला रुसोबद्दल आदर आणि ज्याअर्थी तो तसा खेचला-ओढला गेला, त्याअर्थी रुसोचे काही विचार त्याला मान्य असणार हेही स्पष्ट आहे; पण म्हणून त्याने रुसोची कॉपी, प्रवक्ता, हस्तक किंवा अनुयायी व्हावे असे होत नाही.

कांटच्या शांतीविषयक विचारांचा परामर्श घ्यायचा असेल तर सुरुवात अर्थातच रुसोपासून करावी लागते याचे सूचन याआधी केलेले आहेच. त्याचे कारण रुसो तेव्हाचा एक प्रबळ व प्रस्थापित तत्त्वज्ञ होता. या क्षेत्रात त्याचा दरारा आणि दबदबा असल्याने त्याला वळसा घालून व टाळून पुढे जाणे कोणाला शक्य नव्हते, ही झाली व्यावहारिक किंवा धोरणात्मक कारणमीमांसा. गावात राहणाऱ्याला पाटलाला नमस्कार करावाच लागतो, तो आपल्या कार्यक्रमाला येवो किंवा न येवो, त्याला सन्मानपूर्वक निमंत्रित करावेच लागते. निमंत्रण देऊन तो आला नाही तर त्याचे त्याच्यापाशी. असेल त्याला काही महत्त्वाचे काम असे म्हणून समाधान करून घेता येते. आल्यावर आगतस्वागत करावेच लागते; परंतु निमंत्रण दिलेच नाही आणि दिले असते तरी त्याला काही कारणाने येणे शक्य झाले नसते, तरी निमंत्रण न देणे ही बाब गंभीर ठरू शकते. आज नाही तर उद्या. ते एक प्रकारचे ग्रामदैवतच असते म्हणा ना. तसा प्रकार रुसो आणि कांट यांच्याबाबत नाही. मुद्दा केवळ दखल घेण्याच्या औपचारिक प्रकाराचा नाही. कांटला स्वतःला रुसोविषयी व त्याच्या विचाराविषयी आदर होता. ते टाळता येणार नाहीत हे त्याला ठाऊक होते. Beautiful and Sublime या विषयावर प्रकाशित झालेल्या त्याच्या पुस्तिकेत त्याने रुसोची तुलना चक्क नेपोलियनशी केली आहे. जणू काही तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले! कांट लिहितो - Newton saw for the first time order and regularity combined with great simplicity. Rousseau discovered for the first time beneath the manifold of forms adopted by the human being the deeply hidden nature of the same and hidden law.’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com