
राहुल गडपाले - rahulgadpale@gmail.com
खरेतर तत्त्वज्ञान (Philosophy) हा शब्द ग्रीक भाषेतील ‘philo’ म्हणजेच प्रेम आणि ‘sophia’ म्हणजे ज्ञान या दोन शब्दांपासून बनलेला आहे. त्याचे ‘ज्ञानप्रेम’ असे वर्णन करता येऊ शकते; मात्र आज आपण त्याकडे शास्त्र म्हणून पाहतो. त्याचे अनेक कंगोरे आपणच विकसित केलेत. अनेक विचारवंत तत्त्वचिंतकांनी माणसाच्या या गुणांचा, त्याच्या जाणिवेच्या परिप्रेक्ष्याचा अत्यंत सखोल विचार केल्याचे दिसते. म्हणूनच विचारवंत अलेक्झांडर पोप माणसाला उद्देशून म्हणतो, ‘तू देव होऊ शकत नाहीस; पण निदान सैतान बनू नकोस.’