

Thorium power India
esakal
स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीसाठी भारताला अणुशक्तीशिवाय अन्य दुसरा कोणताही सशक्त पर्याय नाही. आपल्याकडे युरेनियम जरी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसले, तरीसुद्धा पुरेसे थोरियम मात्र उपलब्ध आहे. याच बळावर आपण आपल्या ऊर्जेची गरज पूर्ण करू शकतो. कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्पाने गाठलेला क्रिटिकॅलिटीचा टप्पा म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरतो.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे अवघ्या जगाचीच ऊर्जासुरक्षा धोक्यात आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक अर्थकारणाच्या नाड्या आवळल्या गेल्या होत्या. ही परिस्थिती आत्ताच निर्माण झालेली नाही. याआधीही जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या संघर्षाचा भडका उडला, तेव्हा तेलाला फुटलेली उकळी अर्थकारणाला ब्रेक लावणारी ठरली.