
संजय करकरे
भारत हा खरेतर जैवविविधतेने समृद्ध असा देश. पण देशात अनेक दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातीही आढळतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) माहितीनुसार, देशातील १५५ प्रजाती अतिसंकटग्रस्त (क्रिटिकली एनडेंजर्ड), २४७ प्रजाती संकटग्रस्त (एनडेंजर्ड), तर २१३ प्रजाती धोक्यात (व्हल्नरेबल) आहेत. या सर्व प्रजातींचा विचार केला, तर आपला देश जेवढा समृद्ध आहे, त्याच प्रमाणात आता संकटग्रस्त प्रजातींचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र अलीकडच्या काळात अधिक ठळक होत आहे. वाढती लोकसंख्या, जंगलतोड, औद्योगिकीकरण आणि हवामान बदल यांसारख्या कारणांमुळे अनेक वन्यजीव धोक्यात आले आहेत. त्यामुळेच, केंद्र सरकार आणि विविध संस्था यांनी अनेक संवर्धन प्रकल्प हाती घेतले आहेत.