Premium|Mental health awareness India : सोशल मीडियाचे व्यसन की मानसिक आजार? तरुण पिढीच्या मानसिक आरोग्यावर वाढत्या डिजिटल विळख्याचे गंभीर परिणाम

Psychiatry and counseling benefits : भारतात मानसिक आजारांची ७० ते ९२ टक्के 'ट्रीटमेंट गॅप' ही अत्यंत चिंतेची बाब असून, वाढते डिजिटल व्यसन आणि मानसिक समस्यांवरील सामाजिक अनास्था दूर करण्यासाठी आता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे.
Psychiatry and counseling benefits

Psychiatry and counseling benefits

esakal

Updated on

डॉ. गौरव वडगांवकर

आपल्या देशात मानसिक आजारांच्या बाबतीत ट्रीटमेंट गॅप इतकी मोठी आहे, की आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी पहिली पायरी म्हणजे मानसिक समस्या न लपवता त्यांबद्दल मोकळेपणाने बोलणे. मानसिक आरोग्याचा प्रसार करण्यासाठी जनजागृती होणे आणि सुविधा उपलब्ध असणे जसे महत्त्वाचे आहे, तसेच वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणेदेखील अतिशय महत्त्वाचे आहे.

विसाव्या शतकात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचे आहे ह्याची जाणीव सर्वांना होऊ लागली आणि अनेक तज्ज्ञांनी मानसिक आरोग्याची व्याख्या तयार केली. सिग्मंड फ्रॉइड (१८५६ - १९३९) हे विसाव्या शतकातील प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्‍लेषक होते. त्यांच्या मते मानवी मनाचा खूप मोठा भाग ‘सुप्त’ किंवा ‘अचेतन’ असतो. ह्या सुप्त मनातील दबलेल्या इच्छा, भीती किंवा भावनांमुळे आपल्याला मानसिक आजार होतात. एरिक एरिक्सन (१९०२-१९९४) हेदेखील त्या काळातील प्रख्यात मनोविश्‍लेषक होते आणि त्यांनी मानवी जीवनचक्रात आठ टप्प्यांद्वारे व्यक्तिमत्त्व विकासाची मांडणी केली, ज्याला ‘सायको सोशल डेव्हलपमेन्ट थेअरी’ असे म्हणतात. त्यांच्या मते जीवनाच्या सर्व टप्प्यांमध्ये संघर्ष असतो आणि हे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यास मानसिक आरोग्य सुदृढ होते, अन्यथा व्यक्तिमत्त्वात दोष निर्माण होऊ शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com