Premium|India’s first centurion blood donor couple : शंभर वेळा रक्तदान करणाऱ्या डॉक्टर दांपत्याची प्रेरणादायी जीवनयात्रा

World Blood Donor Day : गेली चार दशके अखंड रक्तदान करत समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉक्टर दांपत्याची प्रेरणादायी कहाणी. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाचे महत्त्व आणि त्यामागील सेवाभाव उलगडणारा विशेष संवाद.
India’s first centurion blood donor couple

India’s first centurion blood donor couple

esakal

Updated on

आरती संतोष करोडे

डॉ. विनीत व चेतना परीख हे दांपत्य २०२३मध्ये शतकवीर रक्तदाते म्हणजेच शंभरवेळा रक्तदान करणारे संपूर्ण भारतातले पहिले दांपत्य ठरले. याची नोंद रेडक्रॉस सोसायटी, अहमदाबादने घेतली. डॉ. विनीत फॅमिली फिजिशियन असून कवी व लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या दवाखान्यात वाचनप्रसारासाठी ग्रंथालयही सुरू केले आहे. चेतनाताई गृहिणी असून, उत्तम इव्हेंट मॅनेजमेंटही करतात. रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ता. १४ जून रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त या दांपत्याशी साधलेला संवाद...

रक्तदान करावे असे तुम्हा दोघांना कधी वाटले?

डॉ. विनीत ः शालेय जीवनानंतर मी १९७८मध्ये एमबीबीएससाठी मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. अभ्यास करत असताना बऱ्याच रुग्णांच्या संपर्कात आलो. तेव्हा समजले, की हिमोफिलिया, थॅलेसेमिया, कॅन्सर इत्यादी आजारांच्या रुग्णांना मोठ्या मात्रेत रक्ताची गरज असते. शिवाय प्रसूती, अपघात आणि मोठमोठ्या शस्त्रक्रियांतदेखील रक्ताची आवश्‍यकता असते. तेव्हाच हेसुद्धा लक्षात आले, की रक्ताची काही फॅक्टरी नसते, त्याचे उत्पादन करणे अजूनतरी शक्य झालेले नाही. जेव्हा एखादी व्यक्ती रक्तदान करते, तेव्हाच ते कोणासाठीतरी उपलब्ध होऊ शकते. अभ्यासकाळात रक्तदानाची गरज आणि महत्त्व लक्षात आल्याने कॉलेजपासूनच रक्तदान करायला सुरुवात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com