

Artificial Intelligence growth in India
esakal
सलील उरुणकर
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. या शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या मोठ्या घोषणा आणि भाषणांचा भारताला नेमका काय, कसा व कधी फायदा होईल याबद्दल ऊहापोह करणारा हा लेख...
‘उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला’ ही मराठीतील म्हण आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय या क्षेत्रात मानवाने घेतलेल्या उडीवर चपखल लागू होते. अवघ्या दशकभरामध्ये एआयच्या क्षेत्रात झालेल्या वेगवान बदलांमुळे आता आपण ‘सिव्हिलायझेशनल चेंज’ होण्याच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. एआय नावाच्या मुसळाचे घाव यापूर्वी कमी बसले, आता अधिक बसत आहेत आणि यापुढे तर एवढे बसतील की त्याची कल्पना भल्याभल्या तज्ज्ञांना आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकांना अद्यापही आलेली नाही. पण या उखळात डोके घातल्यावर आता मुसळाची भीती बाळगण्यापेक्षा त्यावर आपले नियंत्रण आणण्यासाठी जागतिक महासत्तांचे आपापल्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एआयच्या प्राथमिक टप्प्यात काही अंशी मागे पडलेला भारत आता झपाट्याने प्रगती करत आहे.