
गेल्या वर्षभरात आपण अनेक घटनांचे साक्षीदार ठरलो. जग, देश आणि राज्य या तीनही स्तरांवर वाखाणण्याजोग्या, अंतर्मुख करणाऱ्या, डोळ्यांत पाणी उभ्या करणाऱ्या आणि नुसतीच दखल घेण्याजोग्याही कितीतरी घटना घडल्या.
निवडणुकांचे हे वर्ष राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. याच वर्षात जगाने काही संघर्ष तीव्र होताना पाहिले, अर्थकारणानेही बरेच चढ-उतार बघितले; दुसरीकडे विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग अशा क्षेत्रांत खूप काही चांगलेही घडले. तापमानवाढ, पूर, भूस्खलन यांसारखी संकटे टाळण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत हे २०२४ ने पुन्हा एकदा अधोरेखित केले. अनेक सामाजिक समस्यांवर तोडगा काढणे आवश्यक असल्याची जाणीवही पुन्हा करून दिली.
एकंदरीतच अतिशय इव्हेंटफुल ठरलेल्या २०२४ मध्ये घडलेल्या घटनांचा धावता आढावा...