संजीव साबडे
मुंबईच्या चौपाटीवर पाणीपुरी बरोबरचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे भेळपुरी. पूर्वी घरोघरी कुरमुऱ्यांना शेंगदाणे, डाळं व तिखट मिठाची फोडणी दिली जायची. काहीजण फोडणीविनाही खायचे. पण त्यात फरसाण, बारीक कांदा, टोमॅटो, असल्यास कैरी, चाट मसाला, तिखट, आंबट व गोड चटण्या घालून वरून लिंबू पिळून त्यावर शेव व कोथिंबीर पसरून कडक पुरीसह कागदी पुडी हातात देण्याचा प्रकार गुजरातमधून आला असावा. बोरीबंदर भागातील विठ्ठल नावाच्या व्यक्तीने भेळपुरीचा शोध लावला, अशीही वदंता आहे. त्याचं स्वतःचं ‘विठ्ठल भेळपुरी’ हे जुनं, अतिशय लोकप्रिय व मोठं रेस्टॉरंट मात्र नंतर बंद झालं.