Premium|Indian cinema 2000s : रुपेरी पडद्याची रुपेरी झलक!

Bollywood movies history : २००० ते २०२५ या काळातील भारतीय सिनेमाचा प्रवास, ब्लॉकबस्टर चित्रपट, बदलते ट्रेंड, तंत्रज्ञान, अभिनय आणि आशयातील क्रांती यांचा वेध घेणारा हा लेख रुपेरी पडद्यावर घडलेल्या ऐतिहासिक क्षणांची सुस्पष्ट झलक देतो.
Bollywood movies history

Bollywood movies history

esakal

Updated on

नव्या सहस्रकाची चाहूल लागली आणि सिनेसृष्टीनंही आपली कात टाकत नव्या उत्साहात, नव्या ढंगात आपला प्रवास सुरू केला. गेल्या पंचवीस वर्षांत प्रेम, देशभक्ती, स्पर्धा, विनोद, इतिहास, थरार अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक मनोरंजनपर सिनेमे आले. बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, भव्य मांडणी, उत्कृष्ट पटकथा आणि दमदार अभिनय यांमुळे भारतीय सिनेमा जागतिक व्यासपीठावर नुसताच पोहोचला नाही, तर गाजलासुद्धा. तसंच या रुपेरी काळातले काही सिनेमे केवळ सुपरहिट ठरले नाहीत, तर त्यांनी भारतीय सिनेसृष्टीचा चेहरामोहरा कायमचाच बदलून टाकला. २०००पासून प्रत्येक वर्षी येणाऱ्या अनेक सिनेमांपैकी काही ब्लॉकबस्टर ठरलेल्या किंवा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सिनेमांची ही एक छोटीशी झलक...

२०००

१४ जानेवारी २००० रोजी रिलीज झालेला कहो ना प्यार है हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंटच म्हणावा लागेल. या सिनेमातून एक नवा चेहरा लोकांसमोर आला. हिरवट तपकिरी रंगाचे डोळे, तुकतुकीत हँडसम चेहरा, पिळदार शरीर असणाऱ्या हृतिक रोशननं या सिनेमातून सिनेजगतात प्रवेश केला. त्याच्या उत्कृष्ट अभिनयासोबत अफलातून डान्सनं प्रेक्षक त्याच्यावर फिदा झाले. ‘एक पल का जीना...’ आणि ‘कहो ना प्यार है’ या गाण्यांतल्या स्टेप्स तर आजही, २५ वर्षानंतरही, तरुणाईला भुरळ पाडताहेत. या सिनेमानं तब्बल आठ फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. त्यात विशेषतः बेस्ट मेल डेब्यू हृतिक रोशन आणि बेस्ट फीमेल डेब्यू अमिषा पटेल हे दोन्ही पुरस्कार एका सेनेमाला मिळणं म्हणजे एक प्रकारे विक्रमच होता. एखाद्या नवख्या कलाकाराला सुपरस्टार करणारा हा कदाचित पहिलाच सिनेमा असावा.

२००१

बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टचा लगान हा सिनेमा तर सगळ्यांनी पाहिला असेलच. २००१मध्ये सर्वाधिक गाजलेला आणि ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा. दुष्काळ, अन्याय आणि आत्मसन्मान इत्यादी प्रश्नांनी ग्रासलेल्या सामान्य शेतकऱ्यांनी एकजुटीनं ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रिकेटच्या मैदानावर लढलेल्या एका सौम्य युद्धाची ही कथा प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडली. यातला भुवन (आमिर खान) सोबत कचरा (आदिल शेख), कॅप्टन अँड्रयू रसेल (पॉल ब्लॅकथॉर्न), एलिझाबेथ (रेचल शेली) या भूमिकांनी असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली. व्यावसायिक यशासोबत समीक्षकांची दाद, आंतरराष्ट्रीय ओळख आणि भारतीय जीवनाचं जागतिक व्यासपीठावर सादरीकरण हे सगळं या एकाच चित्रपटातून घडलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com