
प्रीती सुगंधी
साहित्य
सात ते आठ पावभाजीचे पाव, १ सामोसा, १ वाटी उभा चिरलेला कांदा, दीड वाटी उभा चिरलेला टोमॅटो, १ टेबलस्पून टोमॅटो सॉस, मीठ चवीनुसार, पाव वाटी बारीक शेव, २ टेबलस्पून हिरवी चटणी.
कृती
प्रथम एका भांड्यात कांदा, टोमॅटो, मीठ, बारीक शेव, टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी एकत्र करून घ्यावी. त्यात एका सामोशाचे चार तुकडे करून मिक्स करावेत. नंतर पाव मधोमध कापून थोडासा लांब करून घ्यावा आणि त्यात तयार केलेले मिश्रण भरावे. हळूवारपणे रोल करावा आणि सामोसा पाव रोल तयार.
टीप : कांदा, टोमॅटो आणि सामोशाचे मिश्रण ताजे तयार करावे आणि लगेच पावामध्ये भरावे. कारण जास्त वेळ ठेवले तर त्या मिश्रणाला पाणी सुटते, ब्रेड सॉगी होतो. तुम्हाला पाहिजे तर हे सामोसा पाव रोल तुम्ही तव्यावर भाजूनसुद्धा खाऊ शकता. दहा मिनिटांत तयार होणारा पदार्थ आहे. सामोसा रोलचे स्लाइस करूनसुद्धा सर्व्ह करू शकता.