
धनश्री हेंद्रे
शुभशकुन म्हणून लावली जाणारी मेंदी आता आधुनिक फॅशन ट्रेंडच झाली आहे. इतकेच नाही तर या कलेला आता मोठे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचे सोळा शृंगार सांगितले आहेत. त्यातीलच एक म्हणजे सुंदर सुबक मेंदी रेखाटणे. लालचुटूक मेंदीने रंगलेले हात स्त्री-मनाला कायमच मोहून टाकतात. मेंदी केवळ रेखाटन न राहता, तिला स्त्री-मनाच्या हळव्या कोपऱ्यात कायमचे स्थान आहे. मेंदीला वयाच्या, परिस्थितीच्या मर्यादा नाहीत. अगदी छोट्या मुलीपासून ते नव्वदीच्या आजीपर्यंत सर्वांच्याच आवडीची असते मेंदी!