Premium|Champaner-Pavagadh Archaeological Park : भारतीय पर्वतीय रेल्वे: अभियांत्रिकीचा अद्वितीय वारसा

Indian Heritage Trains and Tropical Rainforests : निसर्गरम्य डोंगराळ भागातून धावणारी झुकझुक गाडी, गुजरातच्या पावागढ येथील प्राचीन वास्तुकलेचा अनमोल ठेवा आणि जैवविविधतेने नटलेला विशाल पश्चिम घाट भारतीय वारसा आणि नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडवणारा हा विशेष लेख पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरेल.
Indian Heritage Trains and Tropical Rainforests

Indian Heritage Trains and Tropical Rainforests

esakal

Updated on

भारतीय पर्वतीय रेल्वे

  • जवळचे शहर : दार्जिलिंग/ उटी/ शिमला

  • जवळचे विमानतळ : बागडोगरा विमानतळ/ कोइंबतूर विमानतळ/ शहीद भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, चंडीगढ

  • जवळचे रेल्वेस्थानक : न्यू जलपाईगुडी/ मेट्टुपालयम/ कालका

  • केव्हा जाल? :जून ते ऑक्टोबर

वारसास्थळाची वैशिष्ट्ये : पूर्व भारतातील दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी पर्वतीय रेल्वे आणि कालका-शिमला रेल्वे या तीन मुख्य पर्वतीय रेल्वे मार्गांना जागतिक वारसास्थळांचा दर्जा मिळालेला आहे. अत्यंत दुर्गम आणि जटिल, पण निसर्गरम्य अशा डोंगराळ प्रदेशात १८८१ ते १९०८ या काळात बांधलेले हे रेल्वेमार्ग प्रगत अभियांत्रिकी विज्ञानाची आदर्श उदाहरणे आहेत. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमार्ग ८८ किलोमीटर लांबीचा आहे आणि तो न्यू जलपाईगुडीला दार्जिलिंगशी जोडतो. ही रेल्वे २,२५८ मीटर उंचीवर असलेल्या घूम या स्थानकातून जाते. हा मार्ग नागमोडी वळणांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी पर्वतीय रेल्वेमार्ग हा निलगिरी टेकड्यांमधून जाणारा ४५ किलोमीटर लांबीचा एकेरी रेल्वेमार्ग आहे. १८९१मध्ये याचे काम सुरू झाले आणि १९०८मध्ये ते पूर्ण झाले. ३२६ मीटर ते २,२०३ मीटर उंचीपर्यंत प्रवास करणारी ही रेल्वे अत्यंत तीव्र चढ-उतारांसाठी प्रसिद्ध आहे. कालका-शिमला हा ९६ किलोमीटर लांबीचा मार्ग, शिमला या डोंगराळ शहराला जोडण्यासाठी १९व्या शतकाच्या मध्यात बांधला गेला. जगातील सर्वात उंच ‘मल्टी-आर्क गॅलरी ब्रिज’ आणि बांधकामाच्यावेळी जगातील सर्वात लांब असलेला बोगदा हे या रेल्वेच्या अभियांत्रिकी श्रेष्ठत्वाचे पुरावे आहेत. या रेल्वेमार्गांची संरचना एवढी मजबूत आहे, की त्यांचे मूळ स्वरूप आणि वैशिष्ट्ये आजही टिकून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

cm mohan yadav maths park madhya pradesh
pandharpur palakhi marg
lucknow harmony park
Shivalay Park in Prayagraj features replicas of the 12 Jyotirlingas and major Shiva temples on an India map theme for just Rs 50.
Marathi News Esakal
www.esakal.com