डॉ. अमोल सप्तर्षि
भाजी असो वा लोणचे; शाकाहार असो वा मांसाहार, पदार्थाची चव वाढते ती योग्य मसाल्यामुळेच! फक्त या मसाल्यांचा योग्य वापर एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाकडून समजून घ्यायला हवा.
आपण भारतीय मसालेदार पदार्थ खाण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहोत. आपण फार पूर्वीपासून मसाल्यांची निर्यातही करत आहोत. वरवर जरी अन्नपदार्थांची रुची वाढण्यासाठी आणि अन्नातील उग्र गंध घालवण्यासाठी मसाल्याचे पदार्थ वापरले जातात असे दिसत असले, तरी त्यांची उपयुक्तता तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. अन्नाचे पचन सोपे व्हावे आणि काही प्रमाणामध्ये घरगुती औषध म्हणूनही मसाले उपयुक्त ठरावेत, यासाठी आपल्या आहारामध्ये मसाले आवर्जून वापरले जातात.