
क्रीडांगण । किशोर पेटकर
भारतीय पुरुष फुटबॉल संघ अपयशाच्या गर्तेत असतानाच, महिला संघाने आशिया करंडक फुटबॉल स्पर्धेची पात्रता मिळवत नवा विश्वास निर्माण केला आहे. भारतीय फुटबॉल सध्या ‘आसू आणि हसू’ची स्थिती अनुभवत आहे. पुरुष फुटबॉल पूर्णतः विस्कळीत झाले असून, गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत खराब कामगिरी नोंदवल्याने भारतीय पुरुष संघ फिफाच्या जागतिक क्रमवारीत १३३ क्रमांकावर फेकला गेला आहे.