
निकिता कातकाडे
निसर्गाच्या कुशीत हरवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गर्द झाडी, मधूनच कानावर पडणारा पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांआडून डोकावणारे हरणांचे कळप आणि कधी अचानक नजरेस पडणारा एखादा पट्टेरी वाघ! ही अनुभूती केवळ शब्दांत नाही व्यक्त करता येत, ती प्रत्यक्ष जगावी लागते. आपल्या देशात एक हजारापेक्षा जास्त राखीव जंगले आहेत. यातील प्रत्येक जंगल जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याचा ठेवा आहे. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहायचं असेल आणि हिरवाईत मनसोक्त रममाण व्हायचं असेल, तर ही दहा अभायारण्यं तुमच्या यादीत हवीतच!