प्रा. इंदुमती एम. नंबी
जगभर वाढत चाललेल्या प्लॅस्टिक प्रदूषणाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी‘ (आयआयटी) मद्रासने संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांतून शाश्वत उपायांची दिशा दाखवली आहे. प्रयोगशाळेच्या चौकटीत न अडकता, समाजाशी नाळ जुळवत या संस्थेने पर्यावरण रक्षणाचा एक आश्वासक मार्ग दाखवला आहे.
प्लॅस्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयआयटी मद्रासच्या पुढाकाराने काही स्टार्टअप्स पर्यावरणपूरक उपाय शोधत आहेत. स्टार्टअप्स केवळ संशोधनपुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीही ठोस पावले उचलत असल्याचे आशादायक चित्र आता स्पष्ट होत आहे.