Premium|Instant Chakli Recipe : भाजणीची गरज नाही! तांदळाच्या पिठापासून बनवा झटपट कुरकुरीत चकली

Instant Rice Flour Chakli : दिवाळीसाठी झटपट चकली बनवायची आहे? तांदळाचे पीठ, लोणी, मैदा आणि बेसन वापरून इन्स्टंट चकली व बटर चकली बनवण्याच्या सोप्या पाककृती जाणून घ्या.
Instant Rice Flour Chakli

Instant Rice Flour Chakli

esakal

Updated on: 

इन्स्टट तांदळाच्या पिठाच्या चकल्या

साहित्य

दोन कप तांदळाचे पीठ, १ कप मैदा किंवा गव्हाचे पीठ,

१ टीस्पून मीठ, २ टेबलस्पून लोणी (नॉर्मल), अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून लाल मिरची पावडर, २ टेबलस्पून तीळ,

१ चिमूट हिंग, पीठ भिजवण्यासाठी पाणी, चकल्या तळण्यासाठी तेल.

कृती

एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये तांदळाचे पीठ, मैदा व मीठ घालून मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, तीळ, हिंग घालून मिक्स करून घ्यावे. आता त्यामध्ये लोणी घालून परत एकदा चांगले मिक्स करावे. नंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. सोऱ्यात मिश्रण भरायच्या आधी त्याला आतून थोडे तेल लावून घ्यावे. मग मिश्रण थोडे हाताने मळून सोऱ्यात घालून प्लॅस्टिकवर चकल्या पाडाव्यात. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तीन-चार चकल्या हळुवारपणे सोडाव्यात. चकल्या एका पेपरवर काढून ठेवाव्यात, म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल. अशा प्रकारे सर्व चकल्या तळून घ्याव्यात.

बटर चकली

वाढप

२५-३० चकल्या

साहित्य

दोन कप तांदळाचे पीठ, ३ टेबलस्पून फुटाणा डाळीचे पीठ, अर्धा कप बेसन, १ टेबलस्पून बटर, १ टीस्पून लाल मिरची पावडर, १ चिमूट हिंग, पाऊण टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, चकल्या तळण्यासाठी तेल.

कृती

कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. आता एका परातीत तांदळाचे पीठ, फुटाणा डाळीचे पीठ, बेसन, बटर, हिंग, जिरे, लाल मिरची पावडर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मग पिठामध्ये थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. चकलीच्या सोऱ्याला आतून पाणी लावून त्यामध्ये मळलेल्या पिठाचा एक गोळा घालावा. एक स्वच्छ ओले कापड घेऊन त्या कापडावर गोल आकाराच्या चकल्या करून घ्याव्यात. तेल तापल्यावर हळुवारपणे चकल्या गरम तेलामध्ये सोडाव्यात व मध्यम विस्तवावर सोनेरी रंगावर बटर चकल्या तळाव्यात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com