किशोर पेटकर
मोरोक्कनच्या अलाएद्दीन अजारेईने भारतीय फुटबॉलवर वर्चस्व गाजवत इंडियन सुपर लीगच्या २०२४-२५ मोसमात विक्रमी २३ गोलांसह गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल हे दोन्ही पुरस्कार पटकावले.
इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या यावेळच्या मोसमात कोलकात्यातील मोहन बागान सुपर जायंट्स संघाने दमदार वर्चस्व राखले. त्यांनी लीग शिल्डनंतर करंडकही पटकावला. वैयक्तिक पातळीवर नॉर्थईस्ट युनायटेडचा मोरोक्कन आघाडीपटू अलाएद्दीन अजारेई याचा धडाका विलक्षण ठरला.