क्रीडांगण । किशोर पेटकर
जगातील लीग फुटबॉल स्पर्धांचा जम बसलेला आहे. पदोन्नती-पदावनतीवर संबंधित व्यावसायिक क्लब व्यवस्थापनाचे आर्थिक गणित अवलंबून असते. क्लब कोणत्या श्रेणीत आहे हे पाहूनच पुरस्कर्ते निर्णय घेतात.
जगभरातील प्रमुख व्यावसायिक फुटबॉल स्पर्धांना समारोपाचे वेध लागले आहेत. विजेतेपदासाठी जोरदार चुरस अनुभवायला मिळत आहे, त्याचवेळी स्पर्धेतील पदावनती टाळण्यासाठीही आटोकाट प्रयत्न आहेत. अव्वल श्रेणी फुटबॉल स्पर्धेत खराब कामगिरी करणारे तळाचे संघ नियमानुसार खालच्या श्रेणीत जातात आणि खालील विभागातील शानदार कामगिरी करणारे संघ वरील श्रेणीत दाखल होतात. पदोन्नती-पदावनतीचा खेळ प्रत्येक मोसमात लक्षवेधक ठरतो.