Premium|Ramappa Temple UNESCO World Heritage : जयपूर: भारतातील संयोजित शहररचनेचे उत्कृष्ट उदाहरण

Indian Historical Architecture : भारताचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गुलाबी शहर जयपूरची विस्मयकारक नगररचना आणि तेलंगणातील रामप्पा मंदिराचे अद्वितीय भूकंपरोधक स्थापत्यशास्त्र पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, या जागतिक वारसा स्थळांची संपूर्ण माहिती देणारा हा विशेष लेख नक्की वाचा.
Ramappa Temple UNESCO World Heritage

Ramappa Temple UNESCO World Heritage

Updated on

वरूण परब

जयपूर ऐतिहासिक शहर

  • जवळचे विमानतळ : जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • जवळचे रेल्वेस्थानक : जयपूर जंक्शन

  • केव्हा जाल? : नोव्हेंबर ते फेब्रुवारी

वारसास्थळाची वैशिष्ट्ये : राजस्थानमधील हे ऐतिहासिक शहर भारतातील संयोजित शहररचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. १७२७ ते १७३१ या अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत जयपूरचा राजा सवाई जयसिंग द्वितीय याने हे शहर वसविले. राजस्थानमधील इतर पर्वतीय क्षेत्रातील शहरांना अपवाद असे हे शहर सपाट प्रदेशात स्थापaले आहे. या शहराची रचना वास्तुशास्त्रातील ‘प्रस्तार’ या एकमेकांना काटकोनात छेडणाऱ्या आडव्या-उभ्या रेषांच्या आराखड्यावर आधारित आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी बाजारपेठ आहे, ती आजही या शहराचे आकर्षण आहे. रस्ते एकमेकांना जिथे छेदतात, तिथे चौपर म्हणजेच मोठे सार्वजनिक चौक स्थापले आहेत. एकमजली व बहुमजली हवेल्या आणि हवेलीसदृश मंदिरे ही जयपूरची खास वैशिष्ट्ये आहेत. याव्यतिरिक्त गोविंद देव मंदिर, सिटी पॅलेस, जंतर मंतर आणि हवा महल यांसारखी वास्तुशिल्पे त्या काळातील कलात्मकतेचे उत्कृष्ट नमुना दर्शवितात. ऐतिहासिकदृष्ट्या या शहरात ‘छत्तीस कारखाने’ (३६ उद्योग) असल्याचे म्हटले जाते, ज्यात रत्ने, लाखेचे दागिने, दगडांच्या मूर्ती आणि लघुचित्रे यांचा समावेश होता. १९व्या शतकात ब्रिटिश प्रभावामुळे या स्थानिक कलांना अधिक चालना मिळाली. आजही जयपूरचे कारागीर भारतभरातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक जयपूर शहरातील १८व्या शतकातील नगर आराखडा, नऊ प्रवेशद्वारे, बाजारपेठांचे दर्शनी भाग आणि ऐतिहासिक स्मारके हे सर्व घटक आजही सुस्थितीत आहेत. विकासाचा वाढता दबाव असूनही स्वतःचे मूळ स्वरूप टिकवून ठेवणारे हे एक अनोखे शहर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com